For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार कंपन्यांचे राईट इशु होणार सादर

06:51 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार कंपन्यांचे राईट इशु होणार सादर
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

विविध कंपन्यांकडून शेअरबाजारामध्ये गुंतवणूकदारांना लाभांशाची संधी या आठवड्यात उपलब्ध करुन दिली जाणार असून 28 ते 30 एप्रिल दरम्यान 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे राईट इशु सादर होणार आहेत.

राईटस इशुमार्फत कंपनीच्या विद्यमान भागधारकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत अतिरीक्त समभाग खरेदी करण्याची परवानगी मिळते. याने गुंतवणूकदारांना कमी किमतीत आपली हिस्सेदारी वाढवण्याची संधी मिळत असते. शेअरबाजारात इंद्रायणी बायोटेक, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज, शक्तीप्रेस आणि तिरुपती इनोव्हर यांचे राईटइशु दाखल होणार आहेत. 28 एप्रिलला इंद्रायणीचा राईटइशु येणार असून 49.90 कोटी रुपये उभारण्याची तयारी कंपनीची आहे. या अंतर्गत आपल्याजवळ कंपनीचे 7 समभाग असतील तर पाच नवे समभाग खरेदी करण्याची संधी असणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेट 28 एप्रिल आहे.

Advertisement

याच आठवड्यात 29 तारखेला दोन कंपन्यांचे राईटइशु येणार आहेत. इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज यांचा राईटइशु येणार असून 40 रुपये प्रतिसमभाग किंमत निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक 13 समभागांवर तीन समभाग गुंतवणूकदारांना मिळणार आहेत. शक्तीप्रेस यांनी 20 रुपये प्रतिसमभाग किंमत निश्चित केली असून प्रत्येक एका समभागावर सात नवे समभाग खरेदी करण्याची संधी असेल. यांची रेकॉर्डडेट 29 एप्रिल असणार आहे.

30 एप्रिल रोजी तिरुपतीचा राईटइशु सादर होणार असून 10 रुपये प्रतिसमभाग किंमत निश्चित केली आहे. 10 समभागांच्या बदल्यात 19 नवे समभाग गुंतवणूकदारांना दिले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.