For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रायफल ‘विध्वंसक’, स्वयंचलित ग्रेनेड लाँचरचा वापर

06:12 AM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
रायफल ‘विध्वंसक’  स्वयंचलित ग्रेनेड लाँचरचा वापर
Advertisement

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेली ‘एंटी-मटेरियल रायफल विध्वंसक आणि स्वयंचलित ग्रेनेड लाँचर’चे प्रदर्शन केले आहे. या शस्त्रांचा वापर सीमापार पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता.

Advertisement

एंटी-मटेरियल रायफल विध्वंसक

एंटी-मटेरियल रायफल विध्वंसकची रेंज 1300 मीटर आणि 1800 मीटर आहे. या शस्त्राने ऑपरेशन सिंदूरदरम्यान शत्रूचे टॉवर्स आणि बंकर नष्ट केल्याचे बीएसएफच्या एका जवानाने सांगितले.

Advertisement

मीडियम मशीन गन

पाकिस्तानी बंकर नष्ट करण्यासाठी मीडियम मशीन गनचा वापर करण्यात आला. ही गन दर मिनिटाला 600-1000 राउंड फायर करु शकते, अशी माहिती बीएसएफकडून देण्यात आली.

12.7 मिमी एंटी-एअरक्राफ्ट गन

बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोन्सना पाडविण्यासाठी 2.7 मिमी एंटी-एअरक्राफ्ट गनचा वापर केला आहे. ही गन शत्रूचे रणगाडे, तळ आणि ड्रोन्स नष्ट करू शकते. या गनचा वापर करत आम्ही शत्रूची ठिकाणं नष्ट केली आणि त्यांना स्वत:च्या चौक्या सोडून पळ काढण्यास भाग पाडल्याचे बीएसएफच्या जवानाकडून सांगण्यात आले.

स्वयंचलित ग्रेनेड लाँचर

सीमा सुरक्षा दलाने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या चौक्या नष्ट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्वयंचलित ग्रेनेड लाँचरविषयी माहिती दिली आहे. ही स्वयंचलित ग्रेनेड प्रणाली शत्रूच्या चौक्या, तळ आणि त्याच्या बुलेटप्रूफ वाहनांना नष्ट करण्यास अत्यंत यशस्वी शस्त्र ठरले आहे. याची रेंज 1700-2100 मीटर आहे. याद्वारे डागण्यात आलेल्या ग्रेनेडचा मारक पल्ला अत्यंत प्रभावी आहे.

Advertisement
Tags :

.