गोव्यातील बुलेट डर्ट ट्रॅकमध्ये कोल्हापुरातील रायडर्सचा दबदबा
मानाच्या चार ट्रॉफी पटकावल्या
बुलेट सौंदर्य स्पर्धेत दुष्यंत जाधव यांची बुलेट उत्कृष्ट
कोल्हापूर
देशातील बुलेटधारकांमध्ये आकर्षणाचा भाग असलेल्या मोटोव्हर्स-2024 या उपक्रमाचे गोवा येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांअंतर्गत आयोजित केलेल्या थरारक बुलेट डर्ट ट्रॅक स्पर्धेत कोल्हापुरातील टीम डीजे रेसिंगच्या धुरंधर रायडर्सनी वाऱ्याच्या वेगाने बुलेट चालवत मानाच्या चार ट्रॉफी पटकावल्या. वाघाटोर येथील 800 मीटरच्या अत्याधुनिक डर्ट ट्रॅकवर ही स्पर्धा झाली. यामध्ये मानाच्या ट्रॉफींवर आपले नाव कोरण्यासाठी कोल्हापूरच्या चारही रायडर्सनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू, केरळ येथील एका पेक्षा एक अशा तयारीच्या रायडर्संना मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे.
दोन दिवस सुऊ राहिलेल्या मोटोव्हर्स-2024 या उपक्रमाअंतर्गत आयोजित डर्ट ट्रॅक स्पर्धांमध्ये विविध राज्यातील देनशेहून अधिक रायडर्संनी प्रतिनिधीत्व केले. उपक्रमांअंतर्गत घेण्यात आलेल्या 350 सीसी बुलेट एक्सपर्ट प्रकारातील डर्ट ट्रॅक स्पर्धेत टीम डीजे रेसिंगच्या अनिकेत कोरगावकरने पहिला क्रमांक प्राप्त केला. टीम डीजेच्याच आशिष जाधवनेही अनिकेतच्या पावलावर पाऊल टाकत 650 सीसी बुलेट प्रकारातील डर्ट ट्रॅक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 350 सीसी बुलेट एक्सपर्ट प्रकारातही आशिषने तिसरा क्रमांक मिळवला.
18 ते 24 या वयोगटाअंतर्गत घेण्यात आलेल्या बुलेट जेनजी प्रकारातील डर्ट ट्रॅक स्पर्धेत टीम डीजेच्या संदेश पाटीलने तिसरा क्रमांक मिळवला. तसेच टीम डीजेच्या दुष्यंत जाधव, अक्षय जाधव, अमेय काकडे, संजय कोकाटे या रायडर्सनीही आपआपल्या गटातील बुलेट डर्टट्रॅक स्पर्धेत उत्तम रायडिंग केले.
दरम्यान, मोटोव्हर्स-2024 या उपक्रमांतील बुलेट सौंदर्य स्पर्धा (बुलेट क्लिनेस्ट कॉम्पीटीशन) ही अतिशय लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत टीम डीजेच्या दुष्यंत जाधव यांच्यासह देशभरातील 18 बुलेटधारकांनी आपल्या बुलेट सजवून दाखल केल्या होत्या. दुष्यंत यांची बुलेट ही 1961 मॉडेलची होती. अन्य 17 बुलेटही विविध मॉडेडच्या होत्या. स्पर्धेला सुऊवात केल्यानंतर लगेचच उपस्थित लोकांमधून सजवलेल्या सर्व बुलेटबाबत ओपोनियन पोल घेण्यात आला. यामध्ये दुष्यंत यांच्या बुलेटला अनेकांनी उत्कृष्ट आणि सुंटर बुलेट म्हणून पसंती दिली. बक्षीस वितरण समारंभात दुष्यंत यांच्यासह डर्ट ट्रॅक स्पर्धेतील वरील सर्व यशस्वी रायडर्संना ट्रॉफी देऊन गौरवले. त्यांना टीम डीजे रेसिंगचे अध्यक्ष दुष्यंत जाधव, प्रशिक्षक आशुतोष काळे, सुशांत पाटील, अभिजीत पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.