रिकी पाँटिंगकडून न्यूझीलंडच्या कामगिरीचे कौतुक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला दिग्गज माजी खेळाडू रिकी पाँटिंगने नुकत्याच संपलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून पराभूत झाल्याने जेतेपद गमवावे लागले. फायनलनंतर आयसीसी रिह्यूवर बोलताना पॉन्टिंग म्हणाला, ‘मला वाटत नाही की, न्यूझीलंडची मोहीम चुकलेली आहे. मला वाटते की, त्यांनी आणखी एका स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली. उत्कृष्ट स्पर्धा होती.
ते अगदी उत्कृष्ट होते. स्पर्धेच्या सुऊवातीला मला विचारले गेले होते की, अंतिम चार संघांमध्ये कोण पोहोचेल आणि न्यूझीलंडचा त्यात समावेश करणे अपरिहार्य होते. कारण ते नेहमीच तिथपर्यंत धडक देत आलेले आहेत. पण मी यावेळी तसे केले नाही. कारण मला वाटले होते की, पाकिस्तान घरच्या मैदानावर खेळत असल्याने ते आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यामुळे मी न्यूझीलंडची निवड केली नव्हती. पण ते पुन्हा तेथे पोहोचले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या सामन्यात किवींनी प्रभावी कामगिरी केली. कदाचित यापेक्षा चांगला खेळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळू शकत नाही.