Solapur News : सोलापुरात मनपा आणि नॉर्थकोट आवारात परवान्यांच्या प्रतीक्षेत रिक्षा उभ्या
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार जोरात
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बहुतेक सर्व वॉर्डात उमेदवार आपापल्या परीने प्रचार फेऱ्यांमध्ये व्यस्त आहेत.दिवस कमी आणि काम जास्त यातही सरकारी यंत्रणांच्या परवानग्या त्यात जाणारा वेळ यामुळे उमेदवार हैराण झाले आहेत.
एक खिडकी असली तरी किमान कोणत्याही परवानगीला २४ तास लागत आहेत. परवानगीच्या प्रतीक्षेत महापालिका आवार आणि नॉर्थकोट आवारात ०० पेक्षा जास्त रिक्षा उभ्या आहेत. या रिक्षांवर लावलेल्या बॅनरची तपासणी, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपची तपासणी यासह विविध कामांना वेळ लागत असल्याने रिक्षाचालक आणि उमेदवारांचे प्रतिनिधी वैतागले होते.
या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या आणि खिडक्यांची संख्या कमी असल्याने एकाच खिडकीवर मोठी गर्दी झाली. सभांच्या परवानगीचे पत्र देताना विलंब होत असल्याने मंडप, स्पिकर आणि इतर सभा व्यवस्था करण्यात कार्यकर्ते हैराण झाले आहेत.