For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशपूरजवळील अपघातात कंग्राळीच्या रिक्षाचालकाचा मृत्यू

06:22 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशपूरजवळील अपघातात कंग्राळीच्या रिक्षाचालकाचा मृत्यू
Advertisement

दोन मोटारसायकलींची धडक, दोघे जखमी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शनिवारी रात्री क्रांतीनगर-गणेशपूरजवळ झालेल्या वाहन अपघातात कंग्राळी खुर्द येथील रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

राहुल रमेश चुंबुरे (वय 22) रा. सागरनगर, कंग्राळी खुर्द असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो ऑटोरिक्षाचालक होता. तर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला गणेश नाईक (वय 22) व आणखी एका मोटारसायकलवरील शालम देवदानम चिरगुडी (वय 20) रा. गणेशपूर हे दोघे जखमी झाले आहेत.

दोन मोटारसायकलींची धडक होऊन झालेल्या अपघातात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.