सावंतवाडीत रिक्षाची दुकानासह ४ उभ्या दुचाकींना धडक
01:19 PM Jan 04, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने घडला अपघात
Advertisement
सावंतवाडी -
सावंतवाडी सारस्वत बँक नजीक आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतून कॉलेजमार्गे माजगाव येथे जाणाऱ्या रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षा थेट उजव्या बाजूला वळून रस्त्यालगत असलेल्या दुकानासह तेथे पार्क केलेल्या ४ दुचाकींना धडकली . सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला . रिक्षा चालकाला तेथील नागरिकांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले . अपघातात ३ दुचाकींसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे . घटनास्थळी पोलीस दाखल झाले .
Advertisement
Advertisement
Next Article