For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमी खर्चात भरघोस झेंडूची शेती

09:58 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कमी खर्चात भरघोस झेंडूची शेती
Advertisement

झेंडूफुलांना चांगला भाव : पड जमिनीतून कमविले हजारो रुपये : निसर्गावर मात करण्यासाठी शेती व्यवसायात बदल

Advertisement

वार्ताहर /उचगाव

निसर्गाचे बदलते चित्र, पाण्याची टंचाई, पिकांना मिळत नसलेला हमीभाव यावर मात करण्यासाठी म्हणून भातपीक घेतल्यानंतर पड जमिनीत उचगावमधील परशराम सुब्राव पाटील व त्यांच्या पत्नी रेखा या दाम्पत्याने उत्कृष्टरित्या फुलविली झेंडू फुलांची शेती आणि पड जमिनीतून कमविले हजारो ऊपयाचे उत्पादन. हा अलीकडच्या काळातील या भागातील शेतकरी वर्गाला एक आदर्शवत ठरणार आहे. निसर्गाचे बदलत चाललेले चित्र पाहता शेतामध्ये कोणते पीक घ्यावे अन् कोणते घेऊ नये या द्विधा मनस्थितीत आजचा शेतकरी अडकल्याचे दिसून येते. एकवषी भरपूर पाऊस, दुसऱ्या वषी एकदम कमी यामुळे पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकरी वर्गाला सातत्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशा काळात शेतकरी वर्गाने निसर्गावर मात करण्यासाठी यात बदल करत फुलांची शेती करण्याचे या शेतकऱ्याने ठरवून नर्सरीमधील रोपे आणून त्यांची लागवड केली आणि अवघ्या दोन-तीन महिन्यात उत्पादन सुरू झाले.  परशराम यांनी या फुलांची शेती किती महत्त्वाची आहे. याला किती हमीभाव मिळतो, याबरोबरच अल्पावधीत होणारे हे उत्पादन ओळखून जानेवारीमध्ये झेंडू रोपांची लागवड केली. त्यांना योग्य वेळी खत, पाणी देऊन अवघ्या दोनच महिन्यांमध्ये झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन काढण्यात सुऊवात केली आहे.

Advertisement

मार्केटमध्ये फुलांना चांगली मागणी

देवपूजेबरोबरच अनेक समारंभ, कार्यक्रमातून फुलांची गरज असते. यामुळे मार्केटमध्ये फुलांना चांगली मागणीही असते. ही गरज ओळखूनच त्यांनी आपल्या शेतामध्ये ज्या जमिनीत उन्हाळ्यात पीक येऊ शकत नाही, जमीन ओस पडलेली असते, अशा जमिनीत झेंडू फुलाची शेती करून महिन्याभरात हजारो ऊपयांचे उत्पादन त्यांनी मिळविले आहे. या व्यवसायाला म्हणावा तसा कामगार वर्ग ही जादा लागत नाही. परशराम व त्यांची पत्नी रोज दुपारनंतर झेंडू फुलाची तोडणी करतात आणि दुसरे दिवशी पहाटे मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात. असे अनेक व्यवसाय कमी काळात अधिक उत्पादन देणाऱ्या व्यवसायात शेतकरी वर्ग जर गुंतला तर त्यांना निश्चितच आर्थिक उत्पादन इतर पिकापेक्षा मिळेल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थितीही सुधारेल.

Advertisement
Tags :

.