For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरोडा ग्रामसभेत आरजी महिलेवर धक्काबुक्की

12:28 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिरोडा ग्रामसभेत आरजी महिलेवर धक्काबुक्की
Advertisement

परस्पराविरोधी तक्रारी दाखल : पंच मेघशाम शिरोडकर यांचे पंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी,समर्थनास आरजीचे आमदार विरेश बोरकर फोंडा पोलीस स्थानकावर,पंचायत मंडळाची पाण्याच्या बाटल्या फेकणे, पंचायत मालमत्तेची हानीप्रकरणी चार जणावर तक्रार

Advertisement

फोंडा : शिरोडा ग्रामसभेत परवानगीशिवाय मोबाईलवर व्हीडीओ चित्रीकरण केल्याप्रकरणी आरजीच्या एका महिला सदस्याला पंचसदस्याने धक्काबुकी केल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दिंपिती शिरोडकर यांनी दाखल केली आहे. सदर घटना काल रविवारी सकाळी ग्रामसभेत खासगी मोबाईलवरून चित्रीकरण करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून घडली. पंचसदस्य मेघशाम याचे पंचायतीचे सदस्यपद रद्द करावे अशी मागणी यावेळी आरजीच्या सदस्यांनी फोंडा पोलीस स्थानकासमोर केली.   फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोडा ग्रामसभेसाठी सरपंच मुग्धा शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. ग्रामसभेचे कामकाज सुरू करताना त्या स्वागत करण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी आरजीचा एक सदस्य ग्रामसभेचे व्हीडीओ चित्रीकरण करीत असल्यामुळे पंचायत मंडळाने आक्षेप घेतला. पंचायतीतर्फे चित्रीकरण करण्यात येत असून इतर कुणीही व्हीडीओ चित्रीकरण करू नये असे उत्तर पंचायत मंडळाने  दिले. यानंतरही आरजीच्या एका महिलेने आदेश न जुमानता चित्रीकरण सुरू ठेवल्यामुळे पंचसदस्य मेघश्याम शिरोडकर यांनी महिलेचा मोबाईल बंद करण्यासाठी हात घातला. यावेळी प्रतिकार करताना महिलेशी धक्काबुकी झाली. आरजी इतर सदस्य मेघशाम यांच्या अंगावर धावून आले. त्यानंतर जमावाने पंचसदस्य व सरपंचावर पाण्याचा बाटल्याचा वर्षाव केला. या घटनेनंतर ग्रामसभेत धांगडधिंगा झला. अशा वातावरणात ग्रामसभा काही काळानंतर वातावरण थंड झाल्यानंतर इतर ग्रामस्थांच्या आग्रहानुसार संपन्न झाली.

महिलेच्या समर्थनास आमदार विरेश बोरकर फोंडा पोलीस स्थानकावर

Advertisement

(रेव्होल्युशनरी गोवन्स)आरजीच्या शिरोडा महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनिला उर्फ दिपिंती शिरोडकर यांच्या समर्थनास सातआद्रेचे आमदार विरेश बोरकर, दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रूबर्ट परेरा फोंडा पोलीस स्थानकावर हजर झाले होते. त्याशिवाय आरजी स्थानिक नेते शैलेश नाईक, विश्वेश नाईक, प्रेमानंद गावडे व इतर सदस्य उपस्थित होते. दोन्ही विरोधी गटांनी परस्पराविरोधी तक्रारी दाखल केल्या. पंचसदस्य व पंचायत मंडळ व त्dयाच्या समर्थनालाही ग्रामस्थ मोठ्या संख्येने फोंडा पोलीस स्थानकावर हजर झाले होते.

भाजपाचे सरकार महिला विरोधी, ग्रामस्थांचा आवाज दाबणारे  

यावेळी बोलताना आमदार विरेश बोरकर म्हणाले की सध्या भाजपाचे सरकार हे महिला विरोधी सरकार आहे. ग्रामिण भागातील ग्रामस्थाच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी ग्रामसभांमध्ये नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली. 33 टक्के महिलांसाठी आरक्षण हे केवळ दिखाव्याच्या बाजू असल्याचा आरोप आरजीच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी केले. एका महिलेला धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्या पंचसदस्यांना पंचायत सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे. दिपिंता शिरोडकर या महिलेने पंचसदस्य मेघशाम शिरोडकर व सुहास नाईक यांच्याविरोधात फोंडा पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात भां.द.सं. 323,354, 509,506(2) कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सरपंचानी दाखल केली चारजणाविरोधात तक्रार

याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरपंच मुग्धा शिरोडकर यांनी पंचयातीतर्फे सर्व पंचसदस्यांना विश्वासात घेऊन फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पंचसदस्य बाबुराव नाईक यांच्यावर पाण्dयाची बाटली फेकणे, पंचायतीचा कामात अडथळा आणून सुमारे रू. 25 हजारांच्या मालमत्तेची हानीप्रकरणी दिपिंती धीरज शिरोडकर, सोनाली सोमंत नाईक, शैलेश तातू नाईक, विपुल रवेद्र नाईक, धनराज भास्कर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर फोंडा पोलिसांनी पंचसदस्य मेघशाम शिरोडकर यांला जीवे मारण्याची धमकीप्रकरणी चारही संशयितावर भां.द.सं. 143, 354, 427, 506(2) कलमाखाली संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Tags :

.