For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आरजी पक्षात नेतृत्व संघर्ष वाढला, अजय खोलकर यांच्याकडून १८ मतदारसंघांत समित्या जाहीरः आमदार बोरकर यांच्यावर गंभीर आरोप

11:04 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरजी पक्षात नेतृत्व संघर्ष वाढला  अजय खोलकर यांच्याकडून १८ मतदारसंघांत समित्या जाहीरः आमदार बोरकर यांच्यावर गंभीर आरोप
Advertisement

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील (आरजीपी) अंतर्गत संघर्ष आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे नेते अजय खोलकर यांनी काल, सोमवारी पणजीत एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यासोबतच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी १८ मतदारसंघांमधील नव्या समित्यांची अधिकृत घोषणा केली आहे.

Advertisement

या पत्रकार परिषदेला आरजीचे उपाध्यक्ष सेबेस्त्याँव फर्नाडिस, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष गौरेश मांद्रेकर, अनिष नाईक, संस्थापक सदस्य
रोहन कळंगुटकर उपस्थित होते. गोव्याच्या राजकीय पटलावर निवडणुकीपूर्वीच एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, प्रादेशिक पातळीवर महत्त्वाचा मानला जाणारा रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या पक्षात अंतर्गत वादाचा स्फोट झाला आहे. पक्षाचे माजी खजिनदार अजय खोलकर आणि आमदार विरेश बोरकर यांच्यातील थेट संघर्षामुळे पक्षात उभी फूट पडल्यात जमा आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अजय खोलकर यांनी आमदार विरेश बोरकर यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. विरेश बोरकर हे संपूर्ण संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित कष्टामुळेच आमदार म्हणून निवडून आले आहेत. याची आठवण न ठेवता विरेश बोरकर हे पक्षात फूट पडण्यास मुख्य कारण आहे. त्यानंतरही त्यांनी स्वतःलाच केंद्रीय अध्यक्ष घोषित करून आपले हसे करून घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

दरम्यान, विरेश बोरकर यांनी खोलकर यांच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून खोलकर यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे यापूर्वी म्हटले होते. मात्र, खोलकर यांनी ही कारवाई बेकायदेशीर ठरवत पक्ष आणि कार्यकर्त्यांचे हित जपण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या नव्या समित्यांच्या घोषणेमुळे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षामध्ये आता दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र गोव्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

१८ मतदारसंघांमध्ये नवीन व्यूहरचना
अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अस्तित्व आणि संघटन टिकवून ठेवण्यासाठी अजय खोलकर यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले. या रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी गोव्यातील १८ महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये नवीन समित्या जाहीर केल्या आहेत. या समित्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची आणि धोरणांची धुरा सांभाळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.