For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रझा पहलवी यांचे इराण जनतेला आवाहन

06:28 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
रझा पहलवी यांचे इराण जनतेला आवाहन
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

Advertisement

इराणचे सध्याचे प्रशासन कुचकामाचे असून या प्रशासनामुळे इराणची अपरिमित हानी होत आहे. हे प्रशासन गेल्याशिवाय या देशाची प्रगती होणे अशक्य आहे. त्यामुळे इराणच्या जनतेने या प्रशासनाविरोधातील आपले आंदोलन अधिक तीव्र करावे. तसेच प्रशासनाच्या महत्वाच्या इमारतींचा ताबा घ्यावा, असे स्पष्ट आवाहन इराणचे परागंदा राजपुत्र रझा पहलवी यांनी केले आहे. पहलवी हे अनेक दशकांपासून अमेरिकेत आश्रयात आहेत. इराणमध्ये परतण्याची त्यांची इच्छा असून इराणची सत्ता पुन्हा हाती घेण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. त्याचे दिवंगत वडील अहमद रझा पहलवी यांची सत्ता उलथवून इराणची सध्याची धार्मिक राजवट 80 च्या दशकात स्थापन करण्यात आली होती. मात्र, या राजवटीविरोधात आता त्या देशात उग्र आंदोलने होत असून या आंदोलनांना अमेरिकेचा पाठिंबा आहे.

शुक्रवारपासून इराणमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. आंदोलन दडपण्यासाठी इराणचे प्रशासन आंदोलकांवर अत्याचार करीत आहे. अनेक आंदोलक मृत्यूमुखी पडले आहेत. तथापि, आंदोलनाची धार कमी झालेली नाही. योग्य वेळ येताच मी इराणमध्ये येणार आहे. तोपर्यंत आंदोलकांनी धीर न सोडता आणि प्रशासनासमोर हार न पत्करता आंदोलन अधिकाधिक तीव्र करावे. प्रशासनाचे नियंत्रण हाणून पाडावे आणि सत्तापरिवर्तनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी. इराणला एका प्रगतीशील व्यवस्थेची आवश्यकता असून ती देण्यास मी समर्थ आहे, असा संदेश रझा पहलवी यांनी ‘एक्स’द्वारे पोस्ट केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.