जोडीदार शोधल्यास कंपनीकडून बक्षीस
एका चिनी कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी एक अशा पुढाकार घेतला आहे, ज्याबद्दल कळल्यावर लोक चकित होत आहेत. एक तंत्रज्ञान कंपनी स्वत:च्या डेटिंगअॅपवर रोमान्स करण्यासाठी स्वत:च्या कर्मचाऱ्यांनाच कॅश रिवॉर्ड देत आहे. यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही कंपनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांना कामादरम्यान रोमान्स करण्यास प्रोत्साहित देखील करते.
दक्षिण चीनच्या शेनझेनमध्ये असलेल्या इन्स्टा360 कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणणे आणि आनंद वाढविण्याच्या प्रयत्नात एक डेटिंग प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून कर्मचारी कंपनीच्या ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मव्र स्वत:च्या माध्यमातून एखाद्या बाहेरील इसमाला घेऊन येथे आल्यास त्यांना रोख बक्षीस दिले जाणार आहे.
कुठल्याही पोस्टने जर कंपनीबाहेरील एखादा सिंगल या डेटिंग अॅपवर एखाद्याशी परिचित झाला तर अशा प्रत्येक पोस्टसाठी कर्मचाऱ्याला 66 युआन प्राप्त होणार आहेत. जर एखादा कर्मचारी या अॅपवर कंपनीबाहेरील कुणाशी मॅच करत असेल आणि तीन महिन्यांपर्यंत रिलेशनशिप राखत असेल तर कर्मचारी, त्याचा जोडीदार आणि मॅचमेकर यांना 1 हजार युआन दिले जाणार आहेत.
याचदरम्यान कंपनीने आतापर्यंत सिंगल्सविषयी पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींना सुमारे 10 हजार युआन वितरित केले आहेत. या पुढाकाराचे कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे. इन्स्टा360 चा हा पुढाकार चीनमध्ये विवाह अन् जन्मदर खालावला असताना समोर आला आहे. अलिकडेच सादर शासकीय आकडेवारीनुसार 2024 च्या पहिल्या तिमाहीत केवळ 4.74 दशलक्ष जोडप्यांनीच विवाहाची नोंदणी करविली आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 16.6 टक्क्यांनी कमी आहे.