For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्प येथील जुन्या विहिरींचे पुनरूज्जीवन

10:42 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्प येथील जुन्या विहिरींचे पुनरूज्जीवन
Advertisement

कोंडाप्पा स्ट्रीट येथील विहिरीचे पाणी वापरात़

Advertisement

बेळगाव : कॅम्प येथील जुन्या बंद असलेल्या विहिरींचे पुनरूज्जीवन केले जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने लायन्स क्लब व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने विहिरींच्या पुनरूज्जीवनाचे काम सुरू केले आहे. कोंडाप्पा स्ट्रीट येथील विहिरीचे पुनरूज्जीवन झाल्यानंतर सीईओ बंगल्यासमोरील कॅन्टोन्मेंट बोर्ड पार्क येथील विहिरीच्या पुनरूज्जीवनाच्या कामाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव लायन्स, टिळकवाडी लायन्स, बेळगाव मेन, मिडटाऊन व खानापूर या संस्थांनी हाती घेतलेल्या कोंडाप्पा स्ट्रीट येथील विहिरीचे मागील काही दिवसांपासून पुनरूज्जीवन करण्याचे काम सुरू होते. मागील 30 वर्षांपासून बंद असलेल्या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला होता. मागील महिनाभरापासून गाळ व कचरा काढून विहीर स्वच्छ करण्यात आली. सध्या या विहिरीमध्ये 15 फूट पाणीसाठा असून त्याचा उपयोग होणार आहे. 1952 साली या विहिरीचे बांधकाम केले होते. मनपाचे निवृत्त अभियंते आर. एस. नायक व किरण निपाणीकर यांच्या प्रयत्नांतून विहिरीच्या पुनरूज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले. सोमवारी कोंडाप्पा स्ट्रीट येथील विहिरीचे पुनरूज्जीवन करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लबचे अरविंद संगोळ्ळी यांच्यासह कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते.

दुसऱ्या विहिरीचेही पुनरूज्जीवन

Advertisement

सीईओ बंगल्यासमोरील उद्यानात असणाऱ्या विहिरीचे पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. या कामाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार व किरण निपाणीकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या विहिरीतील गाळ काढून ही विहीरदेखील वापरासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील इतर विहिरीही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.