महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅम्प येथील धोबीघाट नाल्याचे पुनरुज्जीवन

11:22 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कॅम्प परिसरातील धोबीघाट नाल्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वेगा ग्रुपच्या मदतीने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील पाणी साठ्यात वाढ होणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या तलावात पाणी साठविण्यास मदत होणार आहे. यावर्षी बेळगाव परिसरात मर्यादित पाऊस झाल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने जलसंधारणासाठी यावर्षी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. धोबीघाट येथे तलावाचे बांधकाम, तसेच कूपनलिकांची खोदाई करताना पूर्वपरवानगी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कूपनलिकांच्या पाण्याची विक्री करतानाही बंधने घालण्यात आली आहेत. धोबीघाट येथे तलावाच्या निर्मितीनंतर आता धोबीघाट नाल्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे. केंद्रीय विद्यालय-2 येथील शर्कत पार्कपासून धोबीघाट नाला वाहतो. या नाल्याच्या पाण्याचा जलसंधारणासाठी उपयोग करून घेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे वेगा ग्रुपच्या मदतीने नाल्याच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने नाल्याचे रुंदीकरण करून स्वच्छता केली जात आहे. याबरोबरच कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांनी आपले निवासस्थान व कार्यालयामध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article