For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील कोरड्या तलावांचे पुनरुज्जीवन

11:23 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यातील कोरड्या तलावांचे पुनरुज्जीवन
Advertisement

नरेगा अंतर्गत स्वच्छता-गाळ काढण्याच्या कामांना गती : पुढच्या वर्षी पाणीसाठा वाढण्याची शक्यता

Advertisement

बेळगाव : यंदा भीषण दुष्काळामुळे जिल्ह्यातील बहुतांशी तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे तलावातील गाळ काढणे आणि इतर कामांना जोर आला आहे. विशेषत: नरेगा योजनेंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन होऊ लागले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तलावांतून पाणीसाठा वाढणार आहे. जिल्ह्यात 2019 ते 2022 पर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती फारशी जाणवली नव्हती. त्यामुळे तलावातील गाळ आणि स्वच्छतेच्या कामाकडेही दुर्लक्ष झाले होते. मात्र आता तलाव आणि कालवे कोरडे पडले आहेत. त्यामुळे या तलावांची स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामाला महत्त्व आले आहे. त्याबरोबर विहिरी आणि कूपनलिका पुनरुज्जीवनाचे कामही हाती घेण्यात आले आहे.

पुढच्या वर्षी पाणीसाठा भरपूर होणार

Advertisement

जिल्ह्यात 400 हून अधिक तलाव गाळ आणि इतर जलपर्णीने भरले आहेत. अशा तलावांमध्ये गाळ, जलपर्णी काढणे आणि स्वच्छतेचे काम केले जात आहे. यंदा पाण्याविना तलाव कोरडे पडल्याने स्वच्छतेचे काम होऊ लागले आहे. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कालवे, तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याबरोबर शेतीलाही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नरेगा अंतर्गत कोरड्या पडलेल्या विहिरी, तलाव आणि कालव्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी या विहिरी, तलाव तुडुंब भरण्याला मदत होणार आहे.

यंदा शाळांचाही विकास

2023-24 मध्ये नरेगा अंतर्गत 122 शाळांसाठी कंपाऊंड बांधण्यात आले आहे. तर 41 शाळांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत. 80 शाळांमध्ये क्रीडांगण तर 9 शाळांमध्ये स्वयंपाक खोलीचा विकास साधण्यात आला आहे. गतवर्षीपासून शाळांमध्ये विविध विकासकामे राबविली जात आहेत. यंदा देखील विविध शाळांचा विकास नरेगा अंतर्गत केला जाणार आहे.

पावसाचा प्रत्येक थेंब साठविणार

नरेगा अंतर्गत विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. पावसाळ्यातील पाण्याची बचत व्हावी यासाठी विविध ठिकाणी तलाव, कालवे आणि विहिरींची पुनरुज्जीवन केले जात आहे. पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी तलाव, विहिरी स्वच्छता आणि गाळ काढणे सुरू आहे.

-राहुल शिंदे-सीईओ जि. पं.

Advertisement
Tags :

.