जि.पं.सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून प्रतिभा शोध परीक्षेचा आढावा
बेळगाव : जिल्ह्यातील सरकारी हायस्कूल्समध्ये शिकणाऱ्या नववी आणि दहावी विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा शोध परीक्षेचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सरकारी सरदार्स हायस्कूलला भेट दिली. तसेच एकूण परीक्षेच्या नियोजनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिंदे यांनी स्पर्धात्मक परीक्षा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. स्पर्धात्मक परीक्षांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची गरज, प्रश्नांची गुणवत्ता, परीक्षा पद्धतीत बदल करण्याची गरज आदी विषयांवर त्यांनी विचार मांडले. यावेळी डायटचे प्राचार्य बसवराज नलतवाड, गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, शिवशंकर हादीमनी यांच्यासह शिक्षण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.