महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर जिल्हा मतमोजणी निकालाचा आढावा

01:12 PM Nov 23, 2024 IST | Pooja Marathe
Review of Kolhapur District Counting Results
Advertisement

कोल्हापूरः

Advertisement

जिल्ह्यात महायुतीचा १० पैकी ९ जागांवर विजय मिळवतानाचे चिन्ह सध्या दिसत आहे. महायुतीच्या उमेद्वारांनी ९ जागांवर आघाडीवर घेत विजयी घोडदौड सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी आघाडी उमेद्वारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे. कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक (भाजप) आणि हातकणंगले मधून अशोकराव माने (जनसुराज्य) यांनी आघाडी घेत विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे.

Advertisement

कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट) यांनी आता आघाडी घेतलेली आहे. कागलमधून हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेत विजयी घोडदौड सुरू ठेवलेली आहे.

शिरोळ मतदार संघातून राजेंद्र यड्रावकर पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी दर्शवित विजयी घोडदौड सुरू ठेवलेली आहे. तर करवीर मतदार संघातून चंद्रदिप नरके यांचीही पहिल्या फेरीपासून आघाडी आहे.

चंदगड मतदार संघातून शिवाजी पाटील ( अपक्ष) यांनी आघाडी घेतलेली आहे. राधानगरी मतदार संघातून प्रकाश आबिटकर २०हजारहुन अधिक मताधिक्य दर्शवून विजयाकडे वाटचाल आहे.

इचलकरंजीतून राहुल आवाडे आघाडीवर असून यांचाही विजय जवळजवळ निश्चित आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article