For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

NCP Politics | सांगलीत दोन्ही राष्ट्रवादींचे 'मनमिलन'? एकाच दालनात थाटले दोन गटनेत्यांचे संसार!

04:19 PM Apr 16, 2026 IST | NEETA POTDAR
ncp politics   सांगलीत दोन्ही राष्ट्रवादींचे  मनमिलन   एकाच दालनात थाटले दोन गटनेत्यांचे संसार
Advertisement

                             सांगली महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकाच दालनात

Advertisement

सांगली : दोन्ही राष्ट्रवादी पक्षएकत्र येणार का, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते. मात्र सांगली महानगरपालिकेत या चर्चेला जणू प्रत्यक्ष स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे.येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्याच्या दालनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्यांनी आपले टेबल आणि खुर्य्या मांडून दालन थाटले आहे.

हे दोन्ही पक्षएकाच छताखाली, एकाच खोलीत एकत्र आले आहेत. महापालिकेत सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. तर महापालिका निवडणुकीवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली होती. सत्ता स्थापनेनंतर पक्षांच्या गटनेत्यांना दालन वाटपाचा मुद्दा समोर आला.

Advertisement

काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना स्वतंत्र दालन मिळाले. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारीभाजपचे गटनेते संदीप आवटी यांना सभागृह नेते म्हणून मोठे दालन मिळाले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वतंत्र दालन मिळवले. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेच्या गटनेत्यांना दालन मिळाले नव्हते. अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या दालनात बैठक व्यवस्था केली.

नाम, पदनामाचे फलक, टेबल, खुर्य्या मांडून दालन थाटले.राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चा झडत असताना महापालिकेत मात्र दोन्ही राष्ट्रवादींचे एकाच छताखाली राजकीय सहअस्तित्व सुरू झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांना अद्याप स्वतंत्र दालन मिळालेले नाही. ते आता आपले दालन कुठे थाटणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.