For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमिनी मूळ मालकांना परत द्या

04:53 PM Jan 09, 2025 IST | Radhika Patil
जमिनी मूळ मालकांना परत द्या
Advertisement

सांगली : 

Advertisement

कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर व घाटमाथा परिसरातील पवनचक्की प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी विक्री करण्याऐवजी मूळ शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी जमीन हक्क शेतकरी संघर्ष समिती करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मागणी करण्यात आली. या मागणीसंदर्भात कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात शुक्रवार 17 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता संबधित पवनचक्की अधिकारी व संघर्ष समितीचे पदधिकारी यांची बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी व खासदार विशाल पाटील यांनी दिले.

20 वर्षापूर्वी पवनचक्की प्रकल्पासाठी या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी दरानुसार कुळमुक्त्यार व साठेखत पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. ज्यावेळी पवनचक्की प्रकल्पासाठी कंपनीला जमिनीची गरज होती. त्यावेळी सामा†जक भान डोळ्यासमोर ठेवून या सर्व गरीब, मागासवर्गीय व इतर शेतक्रयांनी आपल्या जमिनी दिल्या. जमिनी देत असलेले अनेकजण त्यावेळी आ†शा†क्षत होते. कंपनीकडे असलेल्या जमिनीवर आजपर्यंत मूळ शेतकऱ्यांचीच वा†हवाट आहे तसेच 7/12 पत्रकावर भोगवटदार सदरात मूळ शेतकऱ्यांचीच नावे आहेत. आज कंपनी सदर जमिनीची विक्री मूळ शेतकरी सोडून इतरांना करीत आहे. ते त्यांनी थांबवून तसेच मूळ शेतक्रयांना सोडून जे व्यवहार झाले असतील ते सर्व रद्द करून जितकी जमीन कंपनीने खरेदी केली आहे ती सर्व जमीन मूळ शेतकऱ्यांनाच सामजिक भान व नेटिकता  सांभाळून खरेदीदस्ताने परत करावी.

Advertisement

ज्या जमिनी घेताना कंपनीने जो मोबदला दिला तो मोबदला मूळ शेतकरी देण्यास तयार आहेत.या सर्व जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्याने कंपनीचे कोणतेच नुकसान होणार नाही उलट त्यांचा त्यांच्या जमिनीच्या विक्रीचा मार्ग सोपा व सुखकर होईल, अशा मागण्यांचे ा†नवेदन संघर्ष समितीच्या वतीने ा†जल्हा†धकारी व खा. ा†वशाल पाटील यांना देण्यात आले. यावेळी खासदार ा†वशाल पाटील, ा†जल्हा†धकारी राजा दया†नधी, प्रांता†धकारी समीर शिंगटे, नायब तहा†सलदार संजय पवार, संघर्ष सा†मतीचे अध्यक्ष भाई ा†दगंबर कांबळे, ऋतुराज पवार, वैभव केंगार, सुशांत केंगार, ा†वष्णू केंगार, राहुल केंगार, लखन केंगार, व इतर शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.