For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंड संघात वेगवान त्रिकुटाचे पुनरागमन

06:27 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंड संघात वेगवान त्रिकुटाचे पुनरागमन
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पुढील महिन्यात न्यूझीलंडचा क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर टी-20 आणि वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. बांगलादेश दौऱ्यासाठी घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंड संघात वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाचे पुनरागमन झाले आहे. तर सँटनरच्या गैरहजेरीत टॉम लॅथमकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी मॅट फिशर, ओरुरके आणि टिकनेर या तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.

या दौऱ्यासाठी मिचेल सँटेनर हा नियमीत कर्णधार उपलब्ध होवू शकणार नसल्याने क्रिकेट न्यूझीलंडने टॉम लॅथमकडे संघाचे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. तो या दौऱ्यात वनडे आणि टी-20 मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. न्यूझीलंड संघाला आपल्या घरच्या मैदानावर द. आफ्रिका संघाकडून टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंड संघामध्ये अष्टपैलु तसेच फिरकी गोलंदाज डीन फॉक्सक्रॉप्टचे पुनरागमन झाले आहे.

Advertisement

न्यूझीलंड वनडे संघ: टॉम लॅथम (कर्णधार), मोहम्मद अब्बास, आदित्य अशोक, क्रिस्टेन क्लार्क, जोश क्लार्कसन, डॅनी क्लेव्हर, डीन फॉक्सक्रॉप्ट, निकी केली, जायडेन लिनॉक्स, हेन्री निकोल, विल ओरुरके, बेन सिरेस, नाथम स्मिथ, ब्लेयर टिकनेर आणि विल यंग.

न्यूझीलंड टी-20 संघ: टॉम लॅथम (कर्णधार), अॅटेनी क्लार्क, क्रिस्टेन क्लार्क, जोश क्लार्कसन, डॅनी क्लेव्हर, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉप्ट, बिहॉन जेकॉब्ज, निकी केली, जायडेन लिनॉक्स, टीम रॉबिनसन, बेन सिरेस, नाथम स्मिथ, ईश सोधी आणि ब्लेयर टिकनेर

Advertisement
Tags :

.