For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षक नेते म.ल देसाई यांचा आज सेवानिवृत्ती गौरव सोहळा

11:20 AM Jun 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिक्षक नेते म ल देसाई यांचा आज सेवानिवृत्ती गौरव सोहळा
Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी
कोलगाव तसेच मळेवाड केंद्रप्रमुख महादेव लक्ष्मण उर्फ म. ल. देसाई हे आपल्या ३५ वर्षांच्या आदर्शवत शैक्षणिक सेवेतून रविवारी ३० जुन रोजी निवृत्त होत आहेत. यानिमित्त शनिवारी २९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी जेल नजिक वेदिका निवास येथे त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दोडामार्ग तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र असलेले म ल देसाई चौकुळ शाळा नं १ येथे १८/०२/१९८९ मध्ये उपशिक्षक म्हणून रूजू झाले. त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांनी माडखोल, सावंतवाडी, तुळस, या प्राथमिक शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर ते आंबेरी (मालवण), केंद्रप्रमुख आणि आता कोलगाव व मळेवाड केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या दरम्यान शिक्षक नेते आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेत महाराष्ट्र राज्य संयुक्त चिटणीस म ल देसाई यांनी शिक्षक वर्गांच्या न्याय व हक्कासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने नि:स्वार्थीपणे लढा देत शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावल्या.म ल देसाई नियत वयोमानानुसार शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत असल्याचे औचित्य साधून त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वेदिका परीवार, देसाई कुटुंबिय आणि मित्रमंडळाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.