For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीत निवृत्तीवय 70 पर्यंत वाढणार

06:39 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीत निवृत्तीवय 70 पर्यंत वाढणार
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

जर्मन सरकार पेन्शन प्रणालीमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावानुसार, निवृत्तीचे वय 67 वरून 70 पर्यंत वाढवले जाऊ शकते. 45 वर्षांपर्यंत पेन्शन निधीमध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले मुदतपूर्व निवृत्तीचे लाभ देखील रद्द केले जाऊ शकतात. जर्मन माध्यमांच्या वृत्तानुसार, चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ आणि कामगार मंत्री बार्बरा बास यांनी स्थापन केलेला एक आयोग मंगळवारी आपल्या शिफारसी सादर करणार आहे. आयोगाने निवृत्तीचे वय आयुर्मानाशी जोडून ते टप्प्याटप्प्याने 70 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आयोगाने ‘पेन्शन अॅक्ट 63’ ही लोकप्रिय योजना रद्द करण्याची शिफारस देखील केली आहे. त्याअंतर्गत 45 वर्षांपर्यंत योगदान दिलेले कर्मचारी कोणत्याही कपातीशिवाय मुदतपूर्व निवृत्त होऊ शकत होते. वृत्तानुसार, सरकार संसदेच्या जुलै महिन्याच्या सुट्टीपूर्वी हे सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.