For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवृत्त सुभेदार अशोक साईल यांचे निधन

03:56 PM Jun 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निवृत्त सुभेदार अशोक साईल यांचे निधन
Advertisement

भारतीय सैन्य दलाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

भारतीय सैन्य दलाच्या १८ मराठा रेजिमेंटचे निवृत्त सुभेदार तथा कारिवडे - भैरववाडी येथील माजी सैनिक अशोक सखाराम साईल (७०) यांचे शुक्रवारी १९ जून रोजी रात्री निधन झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात लेह, लडाख , जम्मू - काश्मीर या सीमारेषेवर सेवा बजावताना १९७१ च्या लढाईतही भाग घेतला होता. भारतीय सैन्यदलात १८ वर्षे सेवा बजावल्यानंतर सुभेदार पदावरून ते निवृत्त झाले होते. भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आजी माजी सैनिक संघटना व परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व ग्रामस्थांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शनिवारी सकाळी भारतीय सैन्य दलाच्या नियम व ड्रिलनुसार पुष्प चक्र अर्पण करून शोक वंदनेसह मानवंदना देण्यात आली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या नियमानुसार पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी परेड करून त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आला. तसेच ड्रिलनुसार शोक वंदना देताना बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली. यावेळी पूर्व सैनिक संघ आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्य दलातील १८ मराठा रेजिमेंटचे सुभेदार अनिल साईल, पुणेस्थित अमोल साईल यांचे ते वडील होत तर भारतीय सैन्य दलातील सुभेदार विलास साईल यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, भाऊ, बहिणी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.