सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुंडू सावंत यांचे निधन
सावंतवाडी : प्रतिनिधी
कलंबिस्त इंग्लिश हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा संस्थेचे संचालक गुंडू विष्णू सावंत (६०) रा. कलंबिस्त राईवाडी यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. कलंबिस्त येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून ते लोकप्रिय होते. सामाजिक,अध्यात्मिक ,शिक्षण क्षेत्रात पंचक्रोशीत त्यांचे मोठे योगदान होते. ते शांत ,अभ्यासू मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने आजी-माजी विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला आहे. पश्चात पत्नी. विवाहित मुलगा ,सून ,मुली ,नातवंडे ,भाऊ, वहिनी, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे.कलंबिस्त गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश सावंत यांचे ते बंधू होत. तर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका वैशाली सावंत यांचे ते पती होत. सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या सदस्य व जिल्हा बार असोसिएशन माजी महिला प्रतिनिधी. ॲड वेदिका राऊळ आणि तृप्ती सावंत यांचे ते वडील होत तर ॲड. वीरेश राऊळ यांचे ते सासरे होत.