सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे ७ जुलैचे आंदोलन स्थगित
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संघटनेच्या मागण्या व विशेषतः दरमहा होणाऱ्या पेन्शन देयकाच्या दिरंगाई संदर्भात दि. ७ जुलै रोजी ओरोस - सिंधुदुर्गनगरी येथेआंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते . परंतु दि. ३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांचे शिष्टमंडळ व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दरम्यान झालेला चर्चेत सन्माननीय तोडगा निघाल्याने ७ जुलैला होणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीने घेतला आहे.वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशनची मासिक सभा बुधवार दि. 2 जुलै रोजी श्री विठ्ठलमंदिर भुजनाकवाडी वेंगुर्ले येथे झाली होती. त्यावेळी तालुका कार्यकारिणी व सदस्यांनी दि. ०७ जुलै च्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन नियोजन केले होते. परंतु आंदोलन स्थगित झाल्याने वेगुर्ले तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी आंदोलन स्थळी जाऊ नये असे आवाहन तालुकाध्यक्ष झिलू गोसावी, तालुका सचिव विठ्ठल कदम तसेच जिल्हा प्रतिनिधी भरत आवळे व किशोर नरसुले यांनी केले आहे.