कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवृत्त पोलीस उपनिरीक्षकास लाचप्रकरणी सक्तमजुरी

12:41 PM Aug 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकास लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरवत कराडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. भरत गोपाळ होळकर (वय 66, सेवानिवृत्त) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांनी शासकीय कागदपत्रावर पुढील कार्यवाही करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची तक्रार 2014 साली दाखल झाली होती.

Advertisement

याबाबत गुलाब रामचंद्र गुजर (रा. केर, ता. पाटण) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील पोलिसांकडे तक्रार दाखल करत लाच मागणीचा आरोप केला होता. त्यानुसार कराड शहरातील दर्शन रेस्टॉरंटजवळ मोकळ्या जागेत लाच रक्कम स्वीकारताना तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत होळकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.

या प्रकरणाचा तपास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी वैशाली पाटील यांनी केला. सखोल चौकशीनंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादानंतर न्यायालयाने होळकर यांना दोषी ठरवत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि रोख दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. हा निकाल न्याय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.

सदर प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि तपास अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवत न्यायालयीन प्रक्रियेला दिशा दिली. सरकारी पक्षाकडून एम. व्ही. कुलकर्णी व आर. डी. परमाज यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article