For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टिळकवाडीतील निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून दहा लाखांना गंडा

11:23 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
टिळकवाडीतील निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून दहा लाखांना गंडा
Advertisement

मनी लाँड्रिंग प्रकरणात गोवण्याची धमकी

Advertisement

बेळगाव : पोलीस अधिकारी असल्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी एका निवृत्त अधिकाऱ्याला दहा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. यासंबंधी बेळगाव शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. टिळकवाडी येथील रामा कृष्णराव या खासगी कंपनीतील निवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून सीईएन पोलीस पुढील तपास करीत आहेत. ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगून दहा लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे. 5 फेब्रुवारी रोजी रामा यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. ‘आपण ट्रायमधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावावर एक केस झाली आहे. पोलीस तुमच्याशी बोलतात’, असे सांगत स्काईप कॉलच्या माध्यमातून दुसऱ्याला व्हिडिओ कॉल केला. ‘आपण सागर राम नामक पोलीस अधिकारी आहोत. तुमच्यावर मनी लँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईत आला तर सहा महिने कारागृहात घालू व तुमची चौकशी करू’ अशी धमकी दिली. ‘वरिष्ठांकडून परवानगी घेऊन तुमची केस ऑनलाईनच्या माध्यमातून केवळ पंधरा दिवसांत चौकशी करून संपवितो. यासाठी आम्ही सांगू त्या खात्यावर दहा लाख रुपये भरा’ असे सांगितले. या भामट्यावर विश्वास ठेऊन रामा यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा केले. आपण फशी पडलो, हे लक्षात येताच चार दिवसांपूर्वी त्यांनी सायबर क्राईम विभागाकडे फिर्याद दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.