For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इनफ इज इनफ’ चळवळीला निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

01:24 PM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘इनफ इज इनफ’ चळवळीला निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
Advertisement

पणजी : गोव्याचा चाललेला पर्यावरणीय विध्वंस रोखणे आणि पुढील पिढ्यांसाठी गोवा सुरक्षित जतन करण्याच्या आंतरिक प्रेरणेतून न्या. फर्दिन रिबेलो यांनी उभारलेल्या ‘इनफ इज इनफ’ चळवळीला राज्यासह देशभरातील मान्यवरांमधूनही वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्यात रोज नवनवीन कार्यकर्ते आणि प्रतिष्ठितांची भर पडू लागली असून आता राज्यातील विविध सरकारी तसेच खासगी आस्थापनांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार्याचे हात पुढे केले आहेत.

Advertisement

दहा-बारा वर्षांपूर्वी राज्यातील खाण उद्योsग बंद पडल्यानंतर काही प्रमाणात असला तरीही येथील निसर्ग सावरत होता. खाणव्याप्त भागातील लोक स्वच्छ हवेचे श्वास घेऊ लागले होते. परंतु एक संकट टळते न टळते तोच दुसऱ्या बाजूने येथील डोंगर, नद्या, दाट जंगल क्षेत्रे व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये नैसर्गिक संपत्तीवर रिअल इस्टेट लॉबी, विकासक आणि बिल्डर यांची वक्रदृष्टी पडली आहे. सरकार आणि विरोधक यांच्यातील संगनमतामुळे हा विनाश अधिक गतीने होत असल्याचे न्या. रिबेलो यांचे म्हणणे आहे.

त्या पार्श्वभूमीवर न्या. रिबेलो यांची चळवळ लोकांना आशादायी वाटते. म्हणूनच एक ध्येय घेऊन मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आहेत. सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा एकीची गरज आहे. त्याच उद्देशाने निवृत्त कर्मचारी संघटनेने या चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बुधवारी या संघटनेचे प्रतिनिधी आल्वितो डिसोझा यांनी ही भूमिका स्पष्ट केली. रिअल इस्टेट लॉबीकडून गोव्याच्या जंगल व पर्यावरणावर गंभीर आघात होत आहे. झाडांचे संरक्षण करणे हे वनखात्याचे मुख्य कार्य असताना त्यांच्याकडून झाडे तोडण्यासाठी परवानग्या दिल्या जात आहेत. त्यातून मग अशा पर्यावरण संवेदनशील भागांमध्ये मोठमोठे प्रकल्प उभे राहतात, असे आरोप त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.