महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विशेष शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करा

10:21 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विशेष शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मागणी

Advertisement

बेळगाव : अंध, मतिमंद, कर्णबधिर, मूकबधिर अशा विशेष शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी करावे, अशा मागणीचे निवेदन असोसिएशनच्यावतीने रविवारी विधानसौध परिसरात आंदोलनस्थळी देण्यात आले. राज्यात बालकेंद्रित योजनेंतर्गत 136 शाळा कार्यरत आहेत. तर बेळगाव जिल्ह्यात 10 विशेष शाळांमध्ये शिक्षक सेवा बजावत आहेत. मात्र या शिक्षकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. परिणामी दैनंदिन जीवनात अडचणी येवू लागल्या आहेत. त्यामुळे विशेष शिक्षकांना सामान्य शिक्षकांप्रमाणे सवलती आणि वेतन देण्यात यावे, अशी मागणी विशेष शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. विशेष शिक्षकांचे वेतन वेळेत मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन समस्या भेडसावू लागल्या आहेत. शाळेत मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक साहित्याची कमतरता आहे. त्यामुळे विशेष शाळेतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना अडचणी येवू लागल्या आहेत. शाळेच्या व्यवस्थापनासाठी शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळू लागले आहे. त्यामुळे शाळा चालविणेदेखील अशक्य होत आहे. विशेष शाळेतील शिक्षकांना नोकरीत कायमस्वरुपी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article