For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॉलिटेक्निक कॉलेजमधील प्राध्यापकांना नोकरीत कायम करा

10:36 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
पॉलिटेक्निक कॉलेजमधील प्राध्यापकांना नोकरीत कायम करा
Advertisement

विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : मागील 25 ते 30 वर्षांपासून विविध पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या प्राध्यापकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण होत आहे. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्धवेळ सेवा देणाऱ्या प्राध्यापकांना नोकरीत कायम करावे, अशी मागणी अखिल कर्नाटक सरकारी पॉलिटेक्निक अर्धवेळ प्राध्यापक असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. राज्यात पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणून सेवा बजावणाऱ्या प्राध्यापकांची संख्या अधिक आहे. मात्र शासनाकडून कोणत्याच सुविधा उपलब्ध होत नाहीत. शिवाय प्राध्यापकांना कमी वेतनात काम करावे लागते. वर्षातील बारा महिन्यांचे वेतनदेखील सुरळीतपणे दिले जात नाही. त्यामुळे प्राध्यापकांना वाढीव पगार देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष यशवंत आरेर, प्रवीण भीमकट्टी, राजेंद्र तेलूर, पांडुरंग देसाई, अंजुम मीरनाईक आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.