सप्टेंबरमध्ये कार्सच्या किरकोळ विक्रीत 18 टक्के घसरण
डिलर्सकडे 7.9 लाख कार पार्कमध्येच : दुचाकी विक्री 8.51 टक्क्यांनी कमीच
नवी दिल्ली :
देशभरात, वाहनांच्या किरकोळ विक्रीत सप्टेंबर महिन्यात वार्षिक सरासरी पाहिल्यास 9.26 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी गेल्या महिन्यात सुमारे 17.23 लाख वाहनांची विक्री केली. त्याचवेळी, गेल्या वर्षी याच महिन्यात 19 लाख कार्स विकल्या गेल्या होत्या. त्याचवेळी, कार विक्रीत वर्षभरात सुमारे 19 टक्क्यांची घट झाली आहे. कार उत्पादकांनी सप्टेंबरमध्ये 2,75,681 कार विकल्या. त्याचवेळी, गेल्या वर्षी याच महिन्यात 3,39,543 कार्स विकल्या गेल्या होत्या.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) ने आपल्या मासिक विक्री अहवालात ही माहिती दिली. फाडाच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी आणि ओणम हे सण साजरे झाले खरे पण कारची मागणी या काळात फारशी वाढलेली दिसली आहे.
व्यापाऱ्यांनी साठा वाढवला
डिलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की मागणी कमी झाल्यामुळे, डिलर्सनी 80 ते 85 दिवसांचा सुमारे 7.9 लाख वाहनांचा स्टॉक (इन्व्हेंटरी) जमा केला आहे, ज्याची किंमत 79,000 कोटी रुपये आहे.
फाडा म्हणते, ‘डिलरशिप्सवरील उच्च इन्व्हेंटरी लेव्हलमुळे प्रवासी वाहन विभाग गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. ऑक्टोबरमध्ये अपेक्षेप्रमाणे विक्री वाढली नाही, तर मात्र डिलर्सना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
दुचाकींच्या विक्रीतही घट
गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस आणि पितृपंधरवडा दुचाकींच्या विक्रीतही घट झाल्याचे एफएडीएचे म्हणणे आहे. मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत या कालावधीत बाईक-स्कूटर विक्रीत 8.51 टक्क्यांनी घट झाली आहे. दुचाकी कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये 12,04,259 वाहनांची विक्री केली. त्याचवेळी, गेल्या वर्षी याच महिन्यात 13,16,300 दुचाकींची विक्री झाली होती.
तीनचाकी व ट्रॅक्टरची विक्री वाढली
यासह, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये वार्षिक 10.45 टक्क्यांची घट झाली आहे. दुसरीकडे, तीन-चाकी सेगमेंटमध्ये वर्ष-दर-वर्ष 0.66 टक्के आणि ट्रॅक्टर विभागात 14.69 टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून आली.