महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

परीक्षेच्या दिवशीच निकालही

11:05 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हीटीयूचा विक्रम : 42,323 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Advertisement

बेळगाव : आपल्या 25 वर्षांच्या इतिहासात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने नवा विक्रम निर्माण केला आहे. बीई, बीटेक, बीआर्क, बीप्लान सेमिस्टरच्या परीक्षेच्या दिवशीच त्यांनी निकालही जाहीर केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. विद्याशंकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. परीक्षेच्या दिवशीच 42,323 विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. लवकरात लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी अनुकूल ठरणार आहे. विविध क्षेत्रात नोकरी मिळविण्याबरोबरच उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अनुकूल ठरणार आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने प्रशासकीय, शैक्षणिक व परीक्षा विभागात क्रांतीच केली आहे. या विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांत अंतिम सेमिस्टरची परीक्षा 30 मे 2024 रोजी झाली. या परीक्षेत 42,323 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. गुरुवारी सायंकाळी 5.30 पर्यंत ही परीक्षा चालली.

Advertisement

तीन तासांत निकाल

परीक्षा संपवून केवळ तीन तासांत रात्री 8.30 वाजता निकालही जाहीर करण्यात आला असून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट निकाल पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सर्व सेमिस्टरमध्ये उत्तीर्ण होऊन पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 3 जूनपासून प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, असेही विद्यापीठाने सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article