महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑनलाईन बुकिंग नसणाऱ्या ट्रेकिंगवर निर्बंध

09:48 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्याकडून आदेश जारी : पर्यावरण, वन्यजीवांच्या सुरक्षेखातर निर्णय

Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारने ऑनलाईन बुकिंग व्यवस्था नसणाऱ्या ट्रेकिंग मार्गावर पर्यटकांच्या ट्रेकिंगला तात्पुरते निर्बंध घालणारा आदेश जारी केला आहे. याद्वारे लोकांची वनभागातील मोठ्या प्रमाणावरील भटकंती रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. प्रजासत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी पुष्पगिरी वन परिक्षेत्रातील कुमार पर्वताला हजारो ट्रेकर्सनी भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर जंगलात गर्दी होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाईन बुकिंग व्यवस्था नसणाऱ्या राज्यातील ट्रेकिंग मार्गांवर तात्पुरती बंदी घातली आहे. या संदर्भात वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्र्यांनी मुख्य वनसंरक्षक आणि वन टास्कफोर्सच्या प्रमुखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. दर आठवड्याला हजारो ट्रेकर्स घनदाट जंगल असलेल्या भागात विशेषत: मौल्यवान जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटात येत असतील तर पर्यावरणाचीही हानी होईल. तसेच पाण्याचे स्रोतही प्रदूषित होतील. त्यामुळे अशा ट्रेकिंग मार्गांवर ट्रेकर्सना येण्यास मज्जाव करावा, अशी सूचना दिली आहे.

Advertisement

अलीकडे राज्यातील तरुणांमध्ये जंगलात ट्रेकिंग करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे वीकेंडला वनभागात गर्दी वाढत आहे. याठिकाणी येणारे लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या, अॅल्युमिनियमचे कॅन, बाटल्या, ताट, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी जंगलालगतच्या गावांमध्ये आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात फेकून देतात. यामुळे पर्यावरणाची हानी आणि वन्यजीवांना धोका निर्माण होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. इतक्या लोकांवर नियंत्रण ठेवणे आणि सर्वांची तपासणी करून आत सोडणे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक बनले आहे, असे ईश्वर खंड्रे यांनी म्हटले आहे. काही ट्रेकर्स ट्रेकिंग करताना तंबूत रात्रभर मुक्काम करत असल्याचा उल्लेखही ईश्वर खंड्रे यांनी केला आहे. सध्या वनखात्याच्या पर्यावरण पर्यटन विभागाच्यावतीने व्यवस्थापन हाताळल्या जाणाऱ्या टेकिंग मार्गावर 150 ट्रेकर्सनाच परवानगी दिली जाते. याकरिता https://www.karnatakaecotourism.com/या वेबसाईटवर परवानगीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

वनखात्याच्या इको टुरिझम विभागाकडून बुकिंगद्वारे परवानगी दिली जाणारी बेळगाव जिल्ह्यातील ठिकाणे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article