For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक प्रचारासाठी बालकांचा वापर करण्यावर निर्बंध

11:11 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक प्रचारासाठी बालकांचा वापर करण्यावर निर्बंध
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा आदेश : नियम पालन करणे सक्तीचे

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे सक्तीचे केले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी अल्पवयीन बालकांचा उपयोग करून घेऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दखल घेण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच राजकीय पक्षांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे. निवडणूक काळात निवडणुकीच्या प्रचारासाठी अल्पवयीन बालकांचा उपयोग करून घेण्यात येऊ नये, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार सदर आदेश कामगार खात्याच्या आयुक्तांना जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी नितेश पाटील निवडणुकीच्या कामासाठी बाल आणि किशोरवयीन मुलांचा उपयोग करण्यास निर्बंध आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या आदेशात नमूद केले आहे. 18 वर्षांखालील बालकांचा निवडणूक प्रचारासाठी उपयोग करून घेण्यात येऊ नये. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने बाल कार्मिक कायदा 1986 आणि दुरुस्ती कायदा 2016 नुसार सदर आदेश जारी केला आहे.

Advertisement
Advertisement

.