महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी राजकीय प्रचाराला निर्बंध

06:45 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हाधिकारी-निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांचा आदेश

Advertisement

► प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्या प्रमाणे कोणत्याही धार्मिक, प्रार्थना  स्थळांच्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात 16 मार्चपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय पक्षांकडून देवस्थान, चर्च, मशीद तसेच प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी संबंधित प्रशासकीय मंडळाने अथवा प्रमुखांनी कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यक्रमांना अनुमती देऊ नये. राजकीय प्रचाराचे कार्यक्रम हाती घेण्यात येऊ नयेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article