For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविधतेचा सन्मान हीच हिंदूंची ओळख

06:06 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
विविधतेचा सन्मान हीच हिंदूंची ओळख
Advertisement

कॅनडात सरसंघचालक मोहन भागवतांचे वक्तव्य : हिंदू कुठलीही भाषा, पूजापद्धतीपुरते मर्यादित नाहीत

Advertisement

हिंदू शब्दाची कुठलीही खास भाषा, पूजापद्धती किंवा जीवनशैलीद्वारे व्याख्या करता येत नाही. हिंदूचे मुख्य तत्व विविधतेचा सन्मान आणि अस्तित्वाच्या एकतेला ओळखणे आहे. बाहेर अंतर स्वाभाविक आहे, परंतु हिंदू मानवतेला त्याच्या मूळ भावनेत विभाजित करत नसलयाचे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी ग्रेटर टोरंटो भागात 2 हजारांहून अधिक हिंदूंच्या सभेला संबोधित करताना काढले आहेत.

वृत्तसंस्था, टोरंटो

Advertisement

या कार्यक्रमाचे आयोजन ‘कॅनेडियन हिंदूज फॉर आउटरीच, रिलेशन्स अँड डायलॉगकडून करण्यात आले होते. भारत किती सामर्थ्यशाली यावर त्याची प्रगती मोजली जाऊ नये. तर भारत एकजूट मानवतेसाठी किती योगदान देतो यावरून त्याची प्रगती गणली जावी असे म्हणत भागवतांनी हिंदूंना विशेषकरून जगासोबत मैत्रीचे आवाहन केले आहे.

खास भाषा, खास पूजापद्धती किंवा खास जीवनशैली या माणसाच्या विविधता आहेत, हिंदू सर्वांचा सन्मान करतात, हिंदू सर्वांचा स्वीकार करतात, हिंदूंना याबद्दल कुठलीच समस्या नसते. भारताच्या सांस्कृतिक परंपरांनी लोकांना दिसणाऱ्या फरकांखाली एक संयुक्त सिद्धांताला ओळखणे शिकविले आहे, असे भागवत यांनी ‘हिंदू विश्व बंधू’ सभेत बोलताना म्हटले आहे.

विविधतेतील एकता

विविधतेत दडलेल्या एकतेला पाहणे आम्हाला शिकविण्यात आले आहे. याचमुळे भारतात विविधता कधीच एकतेसाठी समस्या ठरत नाही, कारण आमच्या परंपरा आम्हाला ‘विविधतेत एकते’विषयी सांगण्यासोबत ‘एकतेच्या विविधते’विषयी देखील सांगतात. फरकांना स्वीकारले जावे, त्यांचा सन्मान केला जावा आणि त्याचा जल्लोष केला जावा, कारण त्या एका दडलेल्या एकतेची अभिव्यक्ती आहेत. आम्हाला या विविधतेची सेवा करायला हवी, याला स्वीकारायला हवे आणि याचा सन्मान केला जावा, कारण हीच एकतेची अभिव्यक्ती आहे. भारतात नेहमीच अनेक जाती, धर्म, भाषा, परंपरा आणि जीवनशैली राहिलया आहेत. याच्या एकतेसाठी त्या फरकांना संपविणे आवश्यक नाही असे भागवत यांनी म्हटले आहे.

पूर्ण पृथ्वी एक परिवार

कुठलीच गोष्ट एकटी नाही, परंतु सर्व काही एक आहे, सर्व एक आहेत असे आम्ही म्हणत नाही. तर सर्वकाही एक आहे असे आम्ही म्हणतो. विविधता स्वाभाविक आहे. एकताच वास्तविकता आहे. मानवता फरकांचा अनुभव करते, परंतु एक म्हणून कायम राहते. लोकांनी जगाला ‘आपले’ आणि इतरां’चे असे मानून विभागू नये. पूर्ण पृथ्वी एक परिवार आहे, सर्वकाही दिव्य आहे, याचमुळे प्रत्येक गोष्टीचा सन्मान आणि महत्त्व समान आहे. एकमेकांसोबत मिळून राहण्याच्या भावनेनेच इतरांची सेवा करण्याचा भाव स्वाभाविकपणे येतो. दयेची भावना केवळ हिंदूंपुरती मर्यादित नाही, तर हा माणसांचा एक स्वाभाविक गुण असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

भारताने सर्वांना दिला आश्रय

मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू धर्मीयांना ऐतिहासिक स्वरुपात भारतात कुठल्याही छळाशिवाय आश्रय मिळाला आहे. जगात अन्यत्र कुठे कुणावर जुलूम झाल्यास त्याला भारतात स्थान मिळाले असल्याचे उद्गार भागवत यांनी काढले आहेत.

भारत विश्वगुरु, महाशक्ती नाही

हिंदू जागे झाल्यास जग जागे होते. भारताचा डीएनए इतरांची मदत करण्याचा आहे. भारताला विश्वगुरु म्हटले गेले, परंतु तो महाशक्ती नव्हता. जगाच्या सेवेतून भारताला ओळख मिळाली. आमच्या पूर्वजांनी मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत प्रवास केला, परंतु कधीच कुठल्याही देशावर कब्जा केला नाही. आमच्या पूर्वजांनी ज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि संस्कृतीची मूल्य शिकविली आणि जगाचे मन जिंकल्याचे वक्तव्य भागवत यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.