कंग्राळी खुर्द रामदेव गल्लीतील समस्या मार्गी लावा
शिवाजी गल्ली-रामदेव गल्ली रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : रामदेव गल्ली, कंग्राळी खुर्द येथे यल्लाप्पा भीमराव पाटील व त्यांच्या मुलांनी घर बांधले आहे. मात्र रस्ता आणि गटारीसाठी जागा सोडलेली नाही. याबाबत गेल्या पाच-सहा वर्षांपासून ग्राम पंचायतीकडे तक्रार केली जात आहे. पोलीस ठाण्यातही कळविण्यात आले आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. पण या समस्येमुळे रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे सर्व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने तुम्ही स्वत: या लक्ष घालून ग्राम पंचायत अधिकारी व सदस्यांना सांगून समस्या मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी कंग्राळी खुर्द येथील शिवाजी गल्ली आणि रामदेव गल्ली रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शिवाजी गल्ली आणि रामदेव गल्लीच्या कॉर्नरवर यल्लाप्पा पाटील व त्यांच्या मुलाने घर बांधले आहे. पण त्यांनी घरासमोर रस्ता आणि गटारीसाठी जागा सोडलेली नाही. याबाबत स्थानिकांनी ग्राम पंचायत व पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केला असल्याने रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पण त्या ठिकाणच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. रुग्णवाहिकेला वळण घेता न आल्याने एका रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. या समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला जात असून ग्राम पंचायतीसमोर धरणे धरण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यात लक्ष घालून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे.