For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापूर मनपाचे डॉक्टर, रुग्णवाहिका, परिचारिकांचे प्रश्न सोडवा.

10:54 AM Jun 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   सोलापूर मनपाचे डॉक्टर  रुग्णवाहिका  परिचारिकांचे प्रश्न सोडवा
Advertisement

आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठवला आवाज

Advertisement

सोलापूर मनपा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी विधानसभेत आवाज उठविला.

आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेल्या या प्रश्नांवर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आश्वासन दिले. सोलापूर महानगरपालिकेतील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे डॉक्टरांना आणि रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

मागील आठवड्यात तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांना प्रसूती करावी लागली होती, याकडे लक्षवेधत आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष तज्ञ डॉक्टरांची मानधन वाढ न रोखता तत्काळ मानधन वाढ करावी अशी आग्रही मागणी केली.

Advertisement
Tags :

.