For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

न्यायालय-चर्चेने सीमाप्रश्र्न सोडवा!

07:40 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यायालय चर्चेने सीमाप्रश्र्न सोडवा
Advertisement

काळ्यादिनाच्या सभेत निर्धार : जेन झी च्या सहभागामुळे लढ्याला बळ : पुढील निवडणूक महाराष्ट्रातच

Advertisement

न्यायालय किंवा चर्चेच्या माध्यमातून सीमाप्रŽ सोडविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समिती पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. पंच सदस्य समिती, तज्ञ कमिटी, उच्चाधिकार समिती जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही सर्व मराठी जनता राहून सीमाप्रŽ सोडवून घेऊया, असा ठाम निर्धार 1 नोव्हेंबर काळ्यादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत व्यक्त करण्यात आला.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव    : 1 नोव्हेंबर काळ्यादिनानिमित्त मध्यवर्ती म ए. समितीतर्फे मूक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मराठा मंदिरमध्ये सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश शिरोळकर, अॅड. एम. जी. पाटील उपस्थित होते.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले, तऊणांनी आठ किलोमीटरची फेरी तीन तासात चालून हा प्रŽ किती महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे, हे दाखवून दिले आहे. दरवषीच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने युवा फेरीत सहभागी झाले आहेत. दरवषी सुऊवातीला काही मोजकेच कार्यकर्ते धर्मवीर संभाजी उद्यानात उपस्थित असतात. पण यावेळी सुरुवातीला पाचशे ते हजार कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. तऊणांनी यापुढे हा लढा घेतला पाहिजे. यापुढील सर्व निवडणुका जिंकल्या पाहिजेत. महापालिका आपल्या हातातून गेल्यामुळे काय भोगावे लागत आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. एकमेकांमध्ये भांडू नये, प्रŽ सुटावा यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. प्रŽ सुटल्यास आपल्या सर्व निवडणुका महाराष्ट्रमध्ये होतील. अॅड. शिवाजीराव जाधव यांनी नुकताच न्यायालयात अर्ज घातला आहे. शिवसेनेच्या सुनावणीमुळे आपली सुनावणी थोडीशी मागे पडली. पण येत्या पंधरा दिवसात सुनावणी नक्की होईल. सुनावणी झाल्यानंतर जो काय निर्णय होणार आहे त्यानंतर कर्नाटक झुकल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारने न्यायप्रविष्ट आसाम-मेघालयाचा प्रŽ चर्चेने सोडवला. अशा स्वरुपाचादेखील प्रयत्न करावा. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार व इतर तीन मंत्र्यांचा समावेश असलेली पंच सदस्य समिती स्थापन केली आहे. लवकरच या समितीची बैठक होणार आहे. त्या ठिकाणी बेळगावमध्ये जो अन्याय, अत्याचार सुरू आहे त्याबाबत वेगळा दावा दाखल करण्याची तयारी केली आहे. 110 मुद्दे काढण्यात आले आहेत. शहर समिती कार्यालयाबाहेरचा फलक काढला तर एक वेळ बेळगाव बंद करून हिसका दाखवू. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊ. प्रŽाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रयत्न करूया. पुढची कोणतीही निवडणूक कर्नाटकात लढवायची नाही. न्यायालय किंवा चर्चेच्या माध्यमातून प्रŽ सोडवण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समिती महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे.

माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, 1 नोव्हेंबर सीमावासियांचा काळा दिवस. 1956 पासून आम्ही हा काळा दिवस पाळत आहोत. पण, दुर्दैवाने केंद्र सरकारला लोकशाही पद्धतीने चाललेले हे आंदोलन दिसत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सत्तर वर्षात अनेक आंदोलने झाली. अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात जरी खटला असला तरी आम्ही रस्त्यावरच्या लढाईत कोठेही कमी नाही. आज हेच या तऊणांनी दाखविलेले आहे. काहीजण मला म्हणाले, दिल्लीतील जेन झी येथे आले आहेत का? बेळगावतील जेन झी तर पहिल्यापासूनच आहेत ते दिल्लीकडे आता गेलेत. त्यामुळे आपले जेन झी सीमाप्रŽ सोडवून घेतल्याशिवाय गप्प राहणार नाहीत याची आज खात्री झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तीनवर किती शून्य आहेत कळतात की नाही याची शंका आहे. त्यांनी 300 म्हटले होते. आज येथे तीस हजारपेक्षा जास्त लोक आहेत. पोलीस आज जो रिपोर्ट पाठवतात तो त्यांनी खरा पाठवावा म्हणजे त्यांचे डोळे उघडतील. आज जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक करावे की खेदाने निषेध करावा हे कळत नाही. आयएएस झालेल्या माणसाला आकडे कळत नसतील तर दुर्दैव आहे. कितीही अन्याय, अत्याचार केला तरी मराठी माणूस दबणार नाही आणि आंदोलन करण्याचे सोडणार नाही. 70 वर्षे झाली तरी येत्या दीड वर्षात हा प्रŽ सुटल्याशिवाय राहणार नाही. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी आम्हाला फेरीची परवानगी नाकारल्याची नोटीस दिली. हे काही नवीन नाही. सीमाप्रŽ सोडवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे महाराष्ट्र, केंद्र आणि कर्नाटक सरकारला दाखवून देऊया.

रमाकांत कोंडुसकर म्हणाले, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून युवा कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखविली, त्याबद्दल युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन. येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीत ही ताकद दाखवली पाहिजे. जोपर्यंत आपल्या हातात सत्ता नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही, हा विचार आपण केला पाहिजे. महानगरपालिकेत ठराव मांडण्यात आला त्यावेळी म. ए. समितीच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. कोणत्याही राष्ट्रीय पक्षातील नगरसेवकांना येणाऱ्या काळात तुमच्या दारातदेखील घेऊ नका, असा ठाम निर्धार आज करा. तसे केले तरच मराठी भाषा व माणूस टिकणार आहे. तऊणांनी पुढील काळातही सर्व लढ्यांमध्ये सहभागी व्हावे. निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागताना छत्रपती शिवाजी महाराज व भगवा ध्वज लागतो. मात्र अनगोळ नाक्मयावरील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा काढण्यात आली, त्यावेळी एकही राजकीय नेता तेथे गेला नाही. त्यांना त्यांची जागा येत्या काळात दाखवली पाहिजे. सूत्रसंचालन अॅड. एम. जी. पाटील यांनी तर आभार रणजीत चव्हाण-पाटील यांनी मानले.

Advertisement
Tags :

.