For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या त्वरित सोडवा

12:30 PM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या त्वरित सोडवा
Advertisement

मुख्य सचिव डॉ. कंदवेलू यांची अधिकाऱ्यांना सूचना : पर्यटन सुविधा वाढवण्यावर भर द्यावा

Advertisement

पणजी : पर्यटन क्षेत्रात वारंवार भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी   प्रशासकीय कार्यपद्धती सुव्यवस्थित करून खात्यांमध्ये पर्यटन सुविधा वाढवण्यावर भर द्यावा. तसेच निर्णय घ्या आणि त्यांची अंमलबजावणी त्वरित करा, अशी सूचना राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील आव्हाने आणि अन्य सहयोगी उपायांवर चर्चा करण्यासाठी काल गुरुवारी पर्वरीत मंत्रालयातील परिषदगृहात मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय बैठक घेण्यात आली. बैठकीला पंचायत आणि वाहतूक सचिव संजय गोयल, पर्यटन सचिव संजीव आहुजा, बंदर सचिव चेष्टा यादव, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उद्योग सचिव सुनील अंचिपाका, संचालक नागरी विमान वाहतूक एस. टी. देसाई, पर्यटन संचालक  केदार नाईक, व्यवस्थापकीय संचालक जीटीडीसी कुलदीप आरोलकर,  सहसचिव (गृह) तुषार हळर्णकर, अवर सचिव (गृह) मनेश हरी केदार तसेच अबकारी खाते, बंदर कप्तान खाते, पंचायत, वाहतूक, पर्यटन संघटना, एमपीए आणि दाबोळी व मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यटनावर परिणाम करणाऱ्या आंतरविभागीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वित दृष्टिकोन स्वीकारण्याच्या उद्देशाने विविध खात्यातील प्रमुख संबंधितांना एकत्र आणण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत, असे मुख्य सचिव डॉ. कंदवेलू यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.