सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीसाठी ओरोस ग्रामसभेत बहुमताने ठराव
ओरोस ग्रामसभेला उस्फुर्त प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापने मध्ये ओरोस ग्रामपंचायतीचा समावेश करावा की न करावा यासाठी ओरोस ग्रामपंचायतीने आज आयोजित केलेल्या ग्रामसभेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला . यावेळी ग्रामसभेने आवाजी बहुमताने सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी आणि त्यामध्ये ओरोस गावचा समावेश करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे
ओरोस सरपंच अशा मुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस श्री देव रवळनाथ रंगमंच सभा मंडपात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उपसरपंच पांडुरंग मालणकर, ग्रामविकास अधिकारी सरिता धामापूरकर, सर्व ग्रामपचायत सदस्य ,माजी पंचायत समिती सदस्यां सुप्रिया वलावलकर , माजी सरपंच प्रमोद परब, प्रीती देसाई, आनंद उर्फ भाई सावंत,उदयकुमार जांभवडेकर ,संतोष वालावलकर, महेश उर्फ छोटू पारकर, प्रकाश जैतापकर, नागेश ओरोसकर , प्रकाश देसाई, बबन सावंत, शेखर सावंत, सतीश लळीत , अरविंद सावंत,आदेश नाईक आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते