For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून अखेर राजन तेलींनी कमळ सोडले

10:44 AM Oct 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून अखेर राजन तेलींनी कमळ सोडले
Advertisement

भाजप सदस्यत्वाचा दिला राजीनामा ; तेलींच्या उबाठा प्रवेशामुळे तळकोकणात पुन्हा ठाकरे - राणे संघर्षाला सुरुवात

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त आणि फक्त राणे कुटुंबीयांची घराणेशाही चालली आहे. राणे कुटुंबीय फक्त त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम करत आहेत. त्यामुळे आपण नाविलाजास्तव भाजप सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या राजीनामा पत्रात माजी आमदार राजन तेली यांनी आतापर्यंची पक्षातील होणारी घालमेल पक्षश्रेष्ठींकडे कथन केली आहे. आपल्या गतवेळच्या पराभवात कोणी अंतर्गत कुरबुरी केली याचीही जंत्री त्यांनी वाचली आहे. मी भाजपमध्ये प्रामाणिकपणे पक्ष वाढीच्या दृष्टीने काम केले. पण , मला अंतर्गत होणाऱ्या वादामुळे आणि सध्या लोकसभा आणि दोन विधानसभा अशा सर्वच जागांवर राणे कुटुंबीयांची घराणेशाही आहे . यामुळे कार्यकर्ते , पदाधिकारी बिथरले आहेत अशा शब्दात त्यांनी पक्षाला आपली कैफियत मांडून भाजपचे कमळ मनातून काढून टाकले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.