For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम आदमी पक्षामध्ये राजीनामा सत्र

12:14 PM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आम आदमी पक्षामध्ये राजीनामा सत्र
Advertisement

माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, प्रभारी अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचा पक्षाला रामराम

Advertisement

पणजी : गोव्यात अलिकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील अपयश आणि त्यावरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आम आदमी पक्षात (आप) राजीनामा सत्र घडले आहे. ‘आप’चे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आणि प्रभारी अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना हटवून त्या पदाचा ताबा परब यांच्याकडे दिला होता. आता दोघांनी एकाचवेळी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे सध्या ‘आप’ प्रदेशाध्यक्षाविना राहिला आहे. पालेकर यांनी अरविंद केजरीवाल यांना राजीनामा पत्र पाठवले असून पक्षाने कोणतीही चर्चा न करता, परिस्थिती जाणून न घेता पदावरुन हटवणे चुकीचे होते, असे मनोगत पालेकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडले.

पराभवाचे खापर फोडले पालेकरांवर

Advertisement

‘आप’ने कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे जिल्हा पंचायत निवडणूक लढवली आणि 42 जागांसाठी उमेदवार दिले. परंतु केवळ एक जागा जिंकण्यात यश मिळाले. त्याचे खापर प्रदेशाध्यक्ष या नात्याने पालेकर यांच्यावर फोडून त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिशी गोव्यात आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक घेण्यात आली. त्यात निवडणूक निकालावरुन मोठा वाद झाला आणि त्याचे पडसाद उमटून पर्यवसान राजीनाम्यात झाल्याचे सांगण्यात आले. ‘आप’च्या माजी अध्यक्षांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन घरचा आहेर दिला आहे.

Advertisement
Tags :

.