महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हेमंत सोरेन यांचा राजीनामा! चंपई सोरेन होणार झारखंडचे मुख्यमंत्री

06:48 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईडीच्या ताब्यात : 

Advertisement

वृत्तसंस्था/ / रांची

Advertisement

झारखंडमधील बहुचर्चित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना ईडीच्या पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. हेमंत सोरेन यांनी रात्री राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाईची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. याचदरम्यान हेमंत सोरेन यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर झारखंडमधील सत्ताधारी पक्षाचे आमदार राजभवनात पोहोचले. सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांनी चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यानुसार चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.

ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांची बुधवारी मुख्यमंत्री निवासामध्ये सुमारे सात तासांहून अधिक वेळ चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्री निवास, राजभवन, भाजप कार्यालयासह रांचीच्या विविध भागात सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान, रांचीच्या अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री निवासाबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. झारखंडचे डीजीपी आणि मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. हेमंत सोरेन यांच्याविरोधात ईडीकडे भक्कम पुरावे असल्यामुळे त्यांनी चौकशीत सहकार्य न केल्यास किंवा ईडीच्या प्रश्नांची सुसंबद्ध उत्तरे न दिल्यास त्यांना अटक केली जाण्याची शक्यता पूर्वीपासूनच वर्तवली जात होती. आता ईडी त्यांची कोठडी मागण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या माध्यमातून करू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या चौकशीत हेमंत सोरेन यांच्या उत्तरांवर ईडीचे अधिकारी समाधानी नसल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. हेमंत सोरेन यांनी आतापर्यंतच्या चौकशीत फक्त होय किंवा नाही अशी उत्तरे दिल्याची माहिती देण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांना सात तासांच्या चौकशीमध्ये 40 हून अधिक प्रश्न विचारले. यातील अनेक प्रश्न ऐकून हेमंत सोरेन ईडीच्या अधिकाऱ्यांवर संतापल्याची माहितीही उपलब्ध झाली.

मुख्यमंत्रीपदी चंपई सोरेन यांचे नाव आले पुढे

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा जोरात सुरू होती. तथापि, कल्पना सोरेन यांच्याशिवाय चंपई सोरेन यांनाही मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा आमदारांच्या बैठकीत करण्यात आली. हेमंत सोरेन रात्री राजभवनात जाऊन राजीनामा सादर केल्यानंतर झामुमोच्या गटाने राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी चंपई सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील गटाने 43 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही सादर केले.

दिवसभर चौकशीच्या फेऱ्यात

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारही उपस्थित होते. ईडीच्या समन्सवर हेमंत सोरेन यांनीच ईडीला उत्तर देण्यासाठी बुधवारी दुपारचा वेळ दिला होता. अलीकडेच हेमंत सोरेन अचानक गायब झाल्यानंतर ईडीने त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र, सोमवारी रात्री उशिरा हेमंत सोरेन पुन्हा रांचीला पोहोचले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एसटी-एससी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्याविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ईडीने नवी दिल्लीतील शांती निकेतनमधील हेमंत सोरेन यांच्या घरातून 36 लाख ऊपये रोख, एक बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रे जप्त केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article