वारंवार वीजपुरवठा खंडित कावरेपिर्लावासीय हैराण
12:44 PM Jun 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
केपे : कावरेपिर्ला पंचायत क्षेत्रात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावचे सरपंच, उपसरपंच, पंच व इतर लोकांनी केपेतील वीज खात्याचे साहाय्यक अभियंता संजीव म्हाळशेकर यांची भेट घेतली. म्हाळशेकर यांनी सांगितले की, पावसाळ्यानंतर लगेच भूमिगत वाहिन्या घालण्यात येतील. त्यामुळे भविष्यात पावसाचा परिणाम वीजपुरवठ्यावर होणार नाही. रात्रपाळीला लाईनमनची सोय करण्यात येईल. त्यामुळे रात्री फ्यूजमध्ये बिघाड झाला, तरी तो लगेच दूर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कावरेपिर्ला पंचायतीच्या सरपंच विधी वेळीप, उपसरपंच दत्तेश गावकर, पंच उल्हास गावकर, रमाकांत देविदास व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article