मजगाव मुख्य रस्त्याच्या बाजूला दुर्गंधीयुक्त डबक्यामुळे नागरिक त्रस्त
10:44 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : वॉर्ड नं. 58, मजगावच्या मुख्य रस्त्याला लागून असलेली गटार तुडूंब भरुन रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी साचून गेले तीन महिने भलामोठा खड्डा निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूची गटार बुजल्यानेच सदर गटारीचे पाणी रस्त्यावर साचत आहे. या ठिकाणी बेळगाव जिल्हा लेबर ऑफिस, गव्हर्न्मेंट आयटीआय कॉलेज व पी. यु. महाविद्यालय, हायस्कूल व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व औद्योगिक वसाहतीत येणारे शेकडो कामगार वर्ग येथून ये-जा करीत असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित दूषित पाण्याचा निचरा करण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Advertisement
Advertisement