Kolhapur : निवासी जिल्हाधिकारी तेली यांची पदोन्नतीने बदली !
संजय तेली यांची वर्धा येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती
कोल्हापूर : निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची पदोन्नतीने वर्धा येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. २०२३ मध्ये तब्बल १३ महिने रिक्त राहिलेल्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी पुण्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) संजय तेली यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी त्यापूर्वी २०१२ मध्ये जिल्हा अधिकारी कोल्हापूरात पुनर्वसन म्हणून काम पाहिले होते. त्याची आता वर्धाच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नतीने बदली झाली आहे.
त्यांचे मूळगाव फलटण (जि. सातारा) आहे. १९९९ मध्ये अचलपूर (जि. अमरावती) येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर दर्यापूर (जि. अमरावती) येथे तहसीलदार म्हणून रूजू झाले. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी तहसीलदार म्हणून काम केले. २००९ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती होऊन अलिबाग येथे जिल्हा पुरवठा अधिकारी झाले.
संजय तेली यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी (महसूल) म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी, कराड प्रांताधिकारी, खेड प्रांताधिकारी, कोल्हापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदाऱ्या पाडल्या आहेत.