For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिझर्व्ह बँकेच्या ताफ्यात 879 टन सोन्याचा साठा

06:58 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
रिझर्व्ह बँकेच्या ताफ्यात 879 टन सोन्याचा साठा
Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

Advertisement

रिझर्व्ह बँकेकडे असणाऱ्या राखीव सुवर्ण साठ्याचे मूल्य 57 टक्के वाढत 31 मार्चअखेर 4,31,624 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी 31 मार्च 2024 रोजी हे मूल्य 2,74,714 कोटी रुपये होते. याचदरम्यान 31 मार्च 2025 पर्यंत रिझर्व्ह बँकेकडे एकूण सोने हे 879.58 टन इतके साठले आहे.

यापूर्वी 31 मार्च 2024 मध्ये पाहता सोन्याचा साठा 822.10 टन इतका होता. म्हणजेच मागच्या वर्षाच्या तुलनेत सोन्याचा साठा 57.48 टनाने वाढला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्येही जगातील सर्वाधिक तेजीने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था राहिल, असेही आरबीआयने म्हटले आहे. भूराजकीय तणावात मजबूत आर्थिक आकडेवारी व सक्रीय धोरणात्मक उपायाच्या जोरावर 2024-25 मध्ये अर्थव्यवस्था चांगली बहरु शकली. पुरवठा साखळीवर दबाव निवळण्यासोबत जागतिक उत्पादनांच्या किमतीत आलेली घसरण आणि दुसरीकडे दक्षिण-पश्चिम मान्सूनने कृषी क्षेत्राला दिलासा मिळाल्याने महागाई नियंत्रणात राहू शकली आहे. शुल्क आकारणीच्या धोरणात बदल होत आहे. निर्यातीसाठी प्रतिकुल परिस्थिती असून त्याचा सामना आगामी काळात भारताला करावा लागु शकतो, असेही आरबीआयने म्हटले आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेची बैठक

केंद्रीय बँकेने गेल्या दोन बैठकांमध्ये रेपो दरात कपात केलेली आहे. 12 महिन्याच्या कालावधीकरीता एकंदर महागाई 4 टक्केच्या आसपास राहण्याची शक्यता आहे

Advertisement
Tags :

.