कोफोर्जमधील गुंतवणूकीला रिझर्व्ह बँकेची मंजुरी
06:05 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. वृत्तसंस्था/ मुंबई :
Advertisement
टेक सेवा देणाऱ्या कोफोर्ज यांच्यात 100 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेला रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. परिणामी शेअर बाजारात बुधवारी समभाग 3 टक्के वाढत 1155 रुपयांवर पोहचला.
एनकोरा यांच्या अधिग्रहणाबाबतचा रस्ता आता मोकळा झाला असून रिझर्व्ह बँकेची मंजुरी कोफोर्जसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये 30 मार्च रोजी कोफोर्जचा समभाग 2.61 टक्के घसरणीसोबत 1114 रुपयांवर बंद झाला होता. एनकोरासोबतच्या ताज्या करारानंतर 200 कोटी डॉलर्स खर्चुन डाटा, क्लाऊड आणि एआय अंतर्गत अभियांत्रिकी सेवा मजबूत करण्यासाठी भविष्यात प्रयत्न होणार आहेत.
Advertisement
आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 च्या कालावधीत 47.82 कोटी डॉलर्सचा महसुल प्राप्त केला होता.
Advertisement