महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खासगी आस्थापनांमध्ये नोकऱ्यांसाठी आरक्षण अशक्य

01:00 PM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री बाबूश मोन्सेरात यांची माहिती : लवकरच भंगारअड्डे शोधधोरण 

Advertisement

पणजी : राज्यातील खासगी आस्थापनांमध्ये नोकऱ्यांसाठी कोणालाच कसल्याही प्रकारचे आरक्षण ठेवणे रोजगार विनिमय केंद्राला शक्य नाही. कारण यापूर्वी अशा प्रकारचे आरक्षण घटनाविरोधी असल्याचा निवाडा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती कामगार खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभा सभागृहात देत खासगी आस्थापनांमध्ये  नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवणे अशक्य असल्याचे सांगितले. महसूल, जिल्हाधिकारी कार्यालये, कामगार, कचरा व्यवस्थापन खात्याच्या मागण्यांना सभागृहात मान्यता देण्यात आली.

Advertisement

शेत जमिनीमध्ये असलेल्या भंगारअड्ड्यांवर भू नियमाच्या कलम 33 नुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई सुरू केली आहे. भंगारअड्ड्यांसाठी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला असून, या धोरणासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. काही दिवसांतच भंगारअड्डे शोधधोरण पूर्णत्वास येणार असल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सभागृहात सांगितले. वायंगणी या ठिकाणी कचरा प्रकल्पासाठी 3 बोलीदार पात्र ठरले आहेत. प्रस्तावाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. डिचोली येथे कचरा प्रकल्पासाठी जागेचा शोध घेणे सुरू आहे. पेडणे तालुक्यातील तुये या ठिकाणी कचरा प्रकल्पासाठी चिरेखाणीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री मोन्सेरात यांनी सभागृहात दिली.

बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी 17 योजना 

बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी 17 योजना तयार करण्यात आल्या आहेत.  1 लाख 95 हजार 110 कामगारांची ईएसआय या योजनेखाली विमा योजनेत नोंद करण्यात आली आहे, असे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी मेरशी या ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. जागेचा शोध पूर्ण झाल्यानंतर नवीन इमारतीचे काम सुरू होणार आहे, असे मंत्री मोन्सेरात म्हणाले. जमिनीच्या पार्टिशनाचे अर्ज वेळेत निकालात काढण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. महसूल खात्याच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याचे ते सभागृहात म्हणाले.

आपदा मित्र, सखी यांना प्रशिक्षण...

आपत्ती व्यवस्थापनासाठी सरकारने 400 आपदा मित्र आणि 70 आपदा सखी यांना प्रशिक्षण दिलेले आहे, अशी माहिती मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली. कोमुनिदादवर सरकारचे नियंत्रण असून कुठलाच जमीन घोटाळा होऊ दिला जाणार नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांना अनेक कामे असतात. निवडणूक जबाबदारी असते . सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असल्यामुळे त्यांच्याकडे वक्र नजरेने पाहिले जाऊ नये, असे मंत्री बाबूश यांनी सभागृहात सांगितले.

पूजा शर्माचे एका दिवसात म्युटेशन नाही

आसगाव येथील घर पाडण्याच्या प्रकरणात पूजा शर्माने म्युटेशनासाठी 26 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर म्युटेशन 1 ऑक्टोबर 2023 रोजी झाले होते. त्यामुळे पूजा शर्माचे एका दिवसात म्युटेशन झाले असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article